Home महाराष्ट्र तरुणांनी यशस्वी जीवनासाठी चांगली संगत वाढवावी – ॲड. राजू भोसले

तरुणांनी यशस्वी जीवनासाठी चांगली संगत वाढवावी – ॲड. राजू भोसले

124

सचिन सरतापे प्रतिनिधी म्हसवड मोबा.9075686100

म्हसवड : विद्यार्थ्यांनी यशस्वी जीवनासाठी चांगली संगत जोपासून अभ्यास करावा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग प्रदेश संघटक – सचिव ॲड. राजू भोसले यांनी केले.

श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड येथील “टी. वाय. बी. कॉम. विद्यार्थी निरोप समारंभ” व “झाडे लावा झाडे जगवा संदेश” कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संतोष कदम होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन ॲड. राजू भोसले बोलत होते. यावेळी प्रमूख पाहुणे म्हणुन डॉ. प्रा. कुलाळ टी. एस. , प्रा. मनीषा सावंत मॅडम , प्रा. सोनवणे एम.पी. , प्रा. रणवरे डी.जे. व प्रमूख उपस्थितीत प्रा. कु. तांबोळी एन. बी. , डॉ. प्रा. मुल्ला एस. ए. मॅडम, प्रा. डॉ. सौ. देशमुख एस. व्ही. मॅडम., प्रा. क्षीरसागर व्ही. डी., हे प्रमूख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ॲड. राजू भोसले पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी व अभ्यासू लोकांच्या संगतीत राहून अधिकारी किंवा मोठ्यातमोठा व्यावसायिक होणे काळाची गरज आहे. विद्यार्थी चुकीच्या संगत गुणांमुळे गुन्हेगार प्रवृती व व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. त्यामुळे तरुणांचे प्रबोधन करणे काळाची गरज बनली आहे. डेव्हिड बोर्डन च्या मते दहा वेळा प्रयत्न करणारी व्यक्ती केवळ आठ वेळा अयशस्वी होवु शकते. म्हणजेच निसर्गाचा नियम आहे. तुम्ही मनापासून एखादी चांगली गोष्ट करण्याचा दहा वेळा प्रयत्न केला तर तुम्ही किमान दोन वेळा तरी यशस्वी होवू शकता म्हणूनच तरुणांनी अधिकारी होण्यासाठी, व्यावसायिक होण्यासाठी किंवा इतर आपल्या आवडीच्या क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रयत्न करत रहावे आणि उज्वल भविष्य घडवावे असे आवाहन यावेळी ॲड. राजू भोसले यांनी तरुणांना केले.
याप्रसंगी “झाडे लावा झाडे जगवा ” या कार्यक्रमा मध्ये यश पिसे, अजित दहीवडे, अजय गुरव , रोहन कुंभार, भुवनेश्वर आबदागिरे , वैभव सोनवणे, प्रताप लिंगे , कु. शिवानी कालेकर, कु. विजया बागल, कु. हर्षदा वाघ, कु. साक्षी लोटके, कु. मालती केवटे, आरती तावरे, मोहिनी शिंदे, संजीवनी सुर्यवंशी, ऋतिका देशमुख , तेजस्विनी माने यांनी वेगवेगळ्या फळांची झाडे महाविद्यालयाला भेट दिली व पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा संकल्प केला.
या प्रसंगी डॉ. प्रा. कुलाळ टी. एस. , प्रा. मनीषा सावंत मॅडम , प्रा. सोनवणे एम.पी., प्रा. कु. तांबोळी एन. बी. , डॉ. प्रा. मुल्ला एस. ए. मॅडम , कु. साधना ढाले, कु. विजया बागल, अजित दहीवडे यांची भाषणे झाली.
या कार्यक्रमास मयुरी खरारे, चैत्राली पिसे, दिव्या पिसे, यश पिसे, अजित दहीवडे, अजय गुरव , रोहन कुंभार, भुवनेश्वर आबदागिरे , वैभव सोनवणे, प्रताप लिंगे , कु. शिवानी कालेकर, कु. विजया बागल, कु. हर्षदा वाघ, कु. साक्षी लोटके, कु. मालती केवटे, आरती तावरे, मोहिनी शिंदे, संजीवनी सुर्यवंशी, ऋतिका देशमुख , तेजस्विनी माने , साधना ढाले यांच्या सहीत बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनीषा सावंत यांनी केले. सूत्रसंचालन मयुरी खरारे यांनी केले व शेवटी आभार अजय गुरव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here