Home महाराष्ट्र सामाजिक उपक्रमाने बालाजी पाटील ढगे यांचा वाढदिवस साजरा अनावश्यक खर्च टाळून मुलींच्या...

सामाजिक उपक्रमाने बालाजी पाटील ढगे यांचा वाढदिवस साजरा अनावश्यक खर्च टाळून मुलींच्या वसतिगृहास केली आर्थिक मदत

139

 

उमरी :- तालुक्यातील धडाडीचे कार्यकर्ते,छावा क्रांतिवीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढगे यांचा वाढदिवस काल दि. 14 मे रोजी अति उत्साहात साजरा करण्यात आला.

संभाजी ब्रिगेड व छावा क्रांतिवीर संघटना आयोजित छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवाच्या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर यांनी वाढदिवस साजरा केला यावेळी बालाजी पाटील ढगे यांनी मराठा सेवा संघाने चालु केलेल्या मुलींच्या वसतिगृहास 5000 रुपयांचे शिवदान केले.
तद्नंतर नायगाव विधानसभेचे युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण यांनी उमरी येथे उपस्थित राहुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या…..
उपस्थितांसाठी आयोजन समितीच्या वतीने शिवश्री रमेश पवार सर यांचे व्याख्यान आयोजित केले होते..
सदरील सभेस अध्यक्षस्थानी शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर तर उपस्थितांमध्ये सर्वश्री शे.रा.पाटील, उद्धवराव सुर्यवंशी, पांडुरंग अण्णा देशमुख गोरठेकर , बापुसाहेब कौडगावकर,संजयजी कुलकर्णी, संदीप पाटील कवळे,राजु अण्णा,पारसजी दर्डा, दैनिक लोकमत चे तालूक प्रतिनिधी बी.व्ही.चव्हाण सर आदी मान्यवर उपस्थित होते..
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पाटील मोरे यांनी केले तर आभार बालाजी पाटील ढगे यांनी मानले
यावेळी गणेशराव ढगे सर गोविंद पाटील ढगे बालाजी पाटील ढगे लोकेश भोसले नागेश पांढरे नागेश बट्टेवाड गोवर्धन पाटील योगेश पाटील शिंदे योगेश पाटील मोरे मनोज पाटील आदीसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here