Home गडचिरोली मोर्शी तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन ! ...

मोर्शी तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन ! मथुराबाई प्र. ठाकरे चॅरिटेबल ट्रस्टचा अभिनव उपक्रम ! २१ मे रोजी होणार अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर सीआरपी यांचा सन्मान !

130

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी /
मोर्शी तालुक्यामध्ये २०२० ते २०२२ या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कोविडचे संकट घोंगावत असतांना आरोग्य विभाग मात्र सजग होता या आरोग्य विभागांमध्ये गावपातळीवर अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक सीआरपी यांनी केलेले कार्य खरोखरच अभिमानास्पद असून त्याची पोहोच पावती म्हणून त्यांचा सन्मान सोहळा रविवार दि. २१ मे रोजी सकाळी १० वाजता पंजाबबाबा सभागृह रामजिबाबा चौक मोर्शी येथे मथुराबाई प्र. ठाकरे चॅरिटेबल ट्रस्ट व आयोजन समिती तर्फे आयोजित करण्यात आला आहे.
कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून समाजसेवा करून सर्वोत्तम कामगिरी केलेल्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व मदतनीस यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती मथुराबाई प्र. ठाकरे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष निलेश ठाकरे यांनी यावेळी दिली.
या सन्मान सोहळ्याला डॅा. उपेंद्र कोठेकर (विदर्भ संघटनमंत्री, भारतीय जनता पार्टी) खा. रामदास तडस, खा. डॅा. अनिल बोंडे, आ. प्रविणभाऊ पोटे, राजेश वानखडे (संयोजक, अमरावती लोकसभा मतदारसंघ), माजी आमदार प्रा. साहेबराव तट्टे, यांच्यासह आदी मान्यवर मंडळीच्या हस्ते मोर्शी तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व मदतनीस सिआरपी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
मोर्शी तालुक्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस यांचा सत्कार, सन्मान होणार असल्याने मोर्शी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस, गट प्रवर्तक यांनी मोठ्या संख्येने सन्मान सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन मथुराबाई प्र. ठाकरे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नीलेश ठाकरे यांनी केले.

बॉक्स —
कोविड, अतिवृष्टी या सारखे अनेक संकटे येत असतात. या कठिण काळामध्ये ज्या आशावर्कस्, अंगणवाडी सेविका मदतनिस, सीआरपी कष्टकरी महिलांनी तळागाळापर्यंत गरजवंतांना मदत पोहचविली व त्यांना धैर्य दिले. त्यांना मथुराबाई प्र. ठाकरे चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने या सर्व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करणे व त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहण देणे तसेच त्यांचा मानसन्मान करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो — निलेश प्र. ठाकरे संस्थापक अध्यक्ष मथुराबाई प्र. ठाकरे चॅरिटेबल ट्रस्ट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here