


चिमुर / प्रतिनिधी-
महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनीमयन) अधिनियम १९६३ मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार सभापती व उपसभापती पदाच्या नेमणुकीकरीता विशेष सभा दिनांक १२ मे रोजी आयोजीत करण्याची सुचना जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूरचे प्रशांत धोटे यांनी प्राधिकृत अधिकारी एस. बी. सहारे चिमुर यांना केली आहे. त्यानुसार १२ मे रोजी निर्वाचीत सदस्यांतून सभापती व उपसभापती पदाची निवड करण्यात येणार आहे.
चिमुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेसचे सहकार नेते संजय डोंगरे यांचे बहुमत आहे. डोंगरे यांना शेतकरी विकास परिवर्तन आघाडीने साथ दिली होती. यात १८ पैकी १७ संचालक हे डोंगरे गटाचे आहेत. सभापती व उपसभापती पदाची माळ कुणाच्या गळयात पडेल याकडे जनतेचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळामध्ये नंदकुमार गावंडे, दशरथ नन्नावरे, प्रशांत गुरपुडे, कैलास धनोरे, घनश्याम डुकरे, रविंद्र पंधरे, प्रकाश पोहीनकर, गिता कारमेंगे, रेखा मालोदे, राजेंद्र बानकर, प्रशांत चिडे, संदिप पिसे, दिनकर सिनगारे, मंगेश धाडसे, भास्कर सावसाकडे, मनोहर पिसे, अनिल वनमाळी हे डोंगरे गटाचे तर महाविकास आघाडीचे संचालक भरत बंडे यांचा समावेश आहे.













