


सत्यशोधक विश्व धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी) : तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा आणि मानवतेचा संदेश दिला आहे. बुद्धाच्या दिशेने चालण्यासाठी जगाने पुढाकार घेतला आहे. सारे जग बुद्धमय होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कारण जगाला युद्ध नको तर शांती हवी आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे यांनी केले ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सारा भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत तथागत बुध्दांच्या धम्म विचारांचा प्रसार, प्रचार व जागर करण्यासाठी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर Rajarshi Shahu Memorial Building, Kolhapur या ठिकाणी लोकराजे राजर्षी शाहुंच्या नागरीत बुद्ध जयंतीच्या निमित्ताने एक दिवसीय सत्यशोधक विश्व धम्म परिषदेत उदघाटक म्हणून बोलत होते.
या परिषदेचे उदघाटन बोधीवृक्षाला पाणी घालून करण्यात आले.
यावेळी यावर्षीचा धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टचा मानाचा, स्वाभिमानाचा, अभिमानाचा व धम्म चळवळीला गतिमान करणारा धम्मसंगिती जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ धम्म अभ्यासिका विजया कांबळे यांना तर सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंटचा ब्रँड ऑफ महाराष्ट्रा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आयकर सल्लागार डॉ. शंकर अंदानी यांना यांना सन्मानचिन्ह देऊन आणि ग्रंथतुला करून सन्मानित करण्यात आले.
प्रा. किसनराव कुराडे, ॲड. मंचकराव डोणे, बचाराम कांबळे, राखी अंदानी, छाया पाटील, ॲड. करुणा विमल, शण्मुखा आर्दाळकर, मधुकर शिर्के, अनिल म्हमाने, प्रा. दादासाहेब ढेरे, विश्वनाथ कांबळे, डॉ. नंदकुमार गोंधळी, डॉ. शोभा चाळके, चंद्रकांत सावंत, विमल पोखर्णीकर यांची भाषणे झाली.
यावेळी राष्ट्रीय धम्मसंगिती पुरस्कारांने स्वरा सामंत, प्रा. डॉ. स्मिता गिरी, प्रबुद्ध भारत हायस्कूल, मिलिंद शिक्षण संस्था संचलित मिलिंद हायस्कुल, कोल्हापूर आणि पिपंळगाव हायस्कूल, पिपंळगाव (खुर्द) यांना संयुक्त, राजेंद्र बोराळकर, धुळे, प्रा. डॉ. सतीश गंगावणे (बिद्री), आंनदी काळे, कल्पना लोंढे, सुरेखा बनसोडे, दिपक कदम, प्रा. डॉ. संजीव साळवे, शंकर पुजारी, डॉ. सुहास सरवदे यांचाही सन्मान करण्यात आला.
विजया कांबळे यांचा ग्रंथतुला केलेली एक लाख रुपयांची पुस्तके त्यांनी छत्रपती शाहू महाविद्यालयास भेट दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी ती पुस्तके स्वीकारली.
यावेळी धम्मसंगिती, मुजरा, बुद्धा या फिल्मचा प्रीमियर शो संपन्न झाला.
सायंकाळी 6:00 वाजता बुद्ध कि राह पर हा प्रबोधनपर गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. राकेश कोले, संजय काळे, सागर मौर्य, स्वप्निल बेले भास्कर चव्हाण, अमृता गौडदाब, वैदही जाधव संगीतकार प्रदीप जिरगे निवेदक अभिजीत म्हासुर्लीकर यांचा यात महत्वाचा सहभाग होता.
सत्यशोधक विश्व धम्म परिषद किशोर खोबरे, आरिफ काझी, डॉ. निकिता चांडक, शब्बीर काझी, नामदेव मोरे, रुपेश कुसुरकर, केतन घोरपडे, अनघा सुतार अनेक मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबेकर यांनी केले तर आभार अरहंत मिणचेकर यांनी मानले.













