Home चंद्रपूर अखेर पोलिस अंमलदार यांचा नऊ दिवसांनी उपचारा दरम्यान मृत्यू

अखेर पोलिस अंमलदार यांचा नऊ दिवसांनी उपचारा दरम्यान मृत्यू

245

रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
ब्रम्हपुरी(दि. 4 मे ):-
ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले चालक पोलिस अंमलदार महेश कोरे वय 38 यांचे अपघातामध्ये उपचारादरम्यान नागपूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये आज सकाळी निधन झाले.
26/04/2023 रोजी रात्री सुमारे 9:30 ते 10 वाजताच्या दरम्यान टाटा सुमो गाडीने ठोस मारली होती.
यात महेश कोरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना ब्रम्हपुरी येथील खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते . त्यानंतर त्यांना नागपुरात हलविण्यात आले होते. नागपूर येथील न्यूरॉन हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची मृत्यूशी झुंज संपली. मृतकाचे वडील हे सेने मध्ये फौजी होते तर मोठा भाऊ हा सुध्दा सेने मध्ये फौजी असून शहीद झाले होते. त्यांच्या पाठीमागे बराच परिवार असून आई,पत्नी व दोन लहान मुली आहेत.
मृतकच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here