


चिमूर –
मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह चिमूर येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामध्ये सामाजिक न्याय पर्व 1एप्रिल ते 1 मे पर्यत विविध कार्यक्रम घेण्यात आले. या पर्वाची सांगता महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनी सोमवार ला करिअर मार्गदर्शनाने झाली.
कार्यक्रमाची सुरुवात वसतिगृहाच्या गृहपाल सुनिता खोब्रागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गायल्या करन्यात करून तद्नंतर कामगार दिनानिमित्त वसतिगृहाच्या बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान प्रमुख मार्गदर्शक नेचर फाऊंडेशन चे संस्थापक प्रवीण भिमटे यांनी विद्यार्थिनींना करिअर मार्गदर्शन करताना विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना तसेच यश प्राप्तीचे विविध मार्ग याबद्दल मौल्यवान मार्गदर्शन केले.आकाश गायकवाड यांनी एलएलबी मध्ये नौकरीच्या संधींबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन दिक्षा वणकर आभार आशा शेंडे हिने केले. कार्यक्रमास वसतिगृहाच्या गृहपाल सुनिता खोब्रागडे, क. लिपिक मीरा काळे, सर्व बाह्यस्त्रोत कर्मचारी उपस्थित होते.












