Home विदर्भ उमरखेड येथे भीम जयंती जल्लोषात साजरी-“हजारो भीम अनुयायींनी केले बाबासाहेबांना अभिवादन”…!

उमरखेड येथे भीम जयंती जल्लोषात साजरी-“हजारो भीम अनुयायींनी केले बाबासाहेबांना अभिवादन”…!

234

 

✒️ सिद्धार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 15 एप्रिल)
भारतीय राज्यघटने शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उमरखेड शहरांमध्ये जल्लोष साजरी करण्यात आली.

जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड सम्यक बुद्ध येथे दि.11 ते 13 एपिल पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यामध्ये बुद्धिबळ स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा एक मिनिट स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा व तसेच डान्स स्पर्धा ठेवण्यात आले होते.
अतिशय शांतपणे या स्पर्धा संपन्न झाल्यात. तर सायंकाळी 5 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.

सदर शहरामध्ये वजातगाजत व जल्लोषात व अतिशय आनंदात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच पुतळा परिसरामध्ये शरबत स्टॉल, खिचडी स्टॉल, पाणी स्टॉल असे अनेक स्टॉल राजकीय पक्षांनी लावलेले होते.

यावेळी मोहनराव मोरे, गोपाल अग्रवाल, ॲड.संतोष जैन, सुभाषराव दिवेकर, सुधाकरराव लोमटे, सुजाता बनसोड (एपीआई), कुमार केंद्रेकर हे उपस्थित होते.

सादर रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.

या रॅलीचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रफुल दिवेकर, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर कोषाध्यक्ष, शुद्धोधन दिवेकर उपाध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी यांनी केले होते.

यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येने भीम अनुयायी व भीम प्रेमी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here