


चिमूर- नागभीड तालुक्यातील मांगरुड येथे महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते श्री.दिवाकरभाऊ निकुरे यांनी आपली उपस्थिती दर्शविली आणि ग्रामवासियांना मार्गदर्शन केले.
यावेळेस निकुरे यांनी बैठक खुर्च्यांची व्यवस्था करून दिल्याबद्दल दिवाकर निकुरे यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळेस त्यांच्या सोबत भूपेशजी भाकरे, किन्नाके सर, सरपंच यशवंतजी मेश्राम, उपसरपंच वैभवजी निकुरे, तं. मु. स. अध्यक्ष नेताजी निकुरे, पितांबरजी अगडे, जिवनजी शेंडे, माजी पोलीस पाटील तुकारामजी मेश्राम व इतर मान्यवर उपस्थित होते.












