Home महाराष्ट्र किटाळी येथे क्रिकेट प्रीमियर लीग चे उद्घाटन

किटाळी येथे क्रिकेट प्रीमियर लीग चे उद्घाटन

166

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.10मार्च):– जय विदर्भ & 9 स्टार क्रीडा मंडळ किटाळी (बोर) ता. नागभीड जि.चंद्रपूर यांच्या सौजन्याने विजयभाऊ वडेट्टीवार माजी पालकमंत्री चंद्रपूर तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रफुल खापर्डे माजी सभापती पं.स. नागभीड यांच्या हस्ते पार पडले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. दिवाकरभाऊ निकुरे युवानेते चिमुर विधानसभा क्षेत्र, उपाध्यक्ष म्हणून मा.खोजराम मरस्कोल्हे माजी जि. प. सदस्य, तसेच विशेष अतिथी म्हणून नितीन कटारे, सरपंच छगन कोलते, प्रमोद गायकवाड माजी सरपंच सोनूली, उपसरपंच दिपक ठाकरे, विश्वनाथ वलके, निकेश रामटेके खडकी, सदाशिव नागपुरे, ज्ञानेश्वर मेश्राम, मंडळाचे पदाधिकारी, गावकरी उपस्थित होते.

या स्पर्धेचे आयोजन करण्यात मा.दिवाकर निकुरे युवानेते चिमुर विधानसभा क्षेत्र यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळे मंडळाकडून आभार व्यक्त केले, आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून स्पर्धा यशस्वी करण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुपेश भाकरे तर आभारप्रदर्शन जगदीश गुरनुले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here