Home महाराष्ट्र दिलीपराव उर्फ गणेशराव माने यांचे निधन

दिलीपराव उर्फ गणेशराव माने यांचे निधन

202

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.27फेब्रुवारी):- बोरी(चा.) ता. उमरखेड जि. यवतमाळ येथील दिलीपराव उर्फ गणेशराव आनंदराव पाटील माने भंडारकर वय 60 यांची आज 27- 02- 2023 रोज सोमवारला सकाळी साडेसहा वाजता अकस्मिक निधन झाले.पण आमचा विश्वास बसत नाही. जे नियतीला मान्य आहे तेच खरे होणार. बोरी येथील प्रतिष्ठित नागरिक सदन कुटुंबातील व्यक्तिमत्व सर्वांना घेऊन सोबत चालणारे सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे बोरी गावातील लहान थोर मंडळी त्यांना लहाने दादा या नावाने ओळखत होते पूर्णतः सेवाभावी वृत्ती. मनमोकळ्या स्वभावाचा धनी आपल्यातून निघून गेला.

पूर्ण कुटुंबाने शिक्षण क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना तीन मुली दोन मुलं नाती नातवंड असा खूप मोठा परिवार मुलगी सौ.ज्योती पाटील सौ.प्रीती पवार सौ.रेखा देवसरकर प्रा. योगेश माने डॉ. नागेश माने दोन्ही मुलं उच्चविद्या विभूषित झाली. असा एक गौरवशाली परिवाराचा संसार चालत असताना या संसार रथाचे चक्र एक ईश्वराने काढून घेतले व अवघ्या काही क्षणात परिवाराला दुबळे केले. दुःखाच्या डोंगरात लोटले अतिशय वाईट घटना झाली. बोरी गावावर तथा माने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला या दुःखातून सावरण्याची ईश्वराने शक्ती द्यावी हीच ईश्वराकडे मागणी अंत्यविधी फेब्रुवारी रोज मंगळवार सकाळी आठ वाजता आहे.
शोकाकुल माने परिवार बोरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here