Home महाराष्ट्र पार्डी येथे ऍडव्होकेट आशिष देशमुख यांचा सत्कार

पार्डी येथे ऍडव्होकेट आशिष देशमुख यांचा सत्कार

72

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

 पुसद(दि.14जून):-बॉर कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजय मिळविल्याबद्दल ऍडव्होकेट आशिष देशमुख यांचा पार्डी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रामभाऊ गोरे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश पाटील गोरे, अशोक गोरे, शंकर वाघमारे,सिकंदर पठाण अयुब पाटील,पांडुरंग गोरे,भाऊ पाटील,ज्ञानेश्वर वाठ,आनंदराव गोरे,राजकुमार झरकर,बाळासाहेब चव्हाण, प्रदीप गोरे, प्रदीप हरीमकर, विठ्ठल कानडे,रमेश सुकळकर, मनोज जाधव,माधव जाधव, मधुकर हरीमकर,दीपक फुटाणकर, अरुण ढेकळे,लक्ष्मण गोरे,पांडुरंग शिनगारे, प्रमोद सरगर उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण ढेकळे यांनी केले. 

 यावेळी गावातील प्रमुख मार्गाने ढोल ताशाच्या गजरात एडवोकेट आशिष देशमुख यांची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. 

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला.

   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण बरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेंद्र ढोले यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here