


✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
फलटण(दि.13जून):-फलटण शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भीम आर्मी संघटनेच्या वतीने फलटण नगरपालिका प्रशासन व नगराध्यक्षांना स्मरण निवेदन देत शहर खड्डेमुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती .
नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका महिन्यात शहरातील प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. मात्र एक महिना उलटूनही शहरातील रस्त्यांची अवस्था पूर्वीप्रमाणेच असल्याचा आरोप संघटनेने केला होता तसेच दिलेल्या निवेदनात म्हटले होते की , सध्या फलटण शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याची सुरुवात होत असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
खड्ड्यांमुळे वाहतुकीवरही परिणाम होत असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे. रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांच्या आरोग्याला व सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला. असल्याचे निवेदनात नमूद करण्यात होते.
नगराध्यक्षांनी नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करून तात्काळ शहर खड्डे मुक्त करावे अन्यथा संघटना आंदोलन करेल असा इशारा दिला . होता त्यास अनुसरून
आज फलटण नगर पालिका दालना समोर भीम आर्मी संघटने कडून आंदोलन करण्यात आले व येथून पुढे आठ दिवसांत कामास सुरुवात झाली नाही तर ,संघटना आक्रमक भूमिका घेऊन नगराध्यक्षा च्या दालनाला टाळे ठोकणार असा इशारा संघटने कडुन देण्यात आला . त्या वेळी भीम आर्मी संघटनेचे पद अधिकारी.















