Home महाराष्ट्र गंगाखेड येथे ईद-उल-अजहा भक्तीभवाने व उत्साहाने साजरी

गंगाखेड येथे ईद-उल-अजहा भक्तीभवाने व उत्साहाने साजरी

52

▪️ईद निमित्त राष्ट्रवादीचे गटनेते ॲड.मिथिलेश भय्या केंद्रे यांच्याकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.28मे):-शहरात ईद-उल-अजहा (बकरी ईद) हा पवित्र सण मोठ्या उत्साहात,धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात (दिनांक २८ मे गुरुवार) रोजी साजरा करण्यात आला.शहरातील हजरत उमर बिन खताब रजी ईदगाह तसेच गौसे आजम ईदगाह येथे मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून देशाच्या सुख-शांतीसाठी विशेष दुआ केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक ॲड.मिथिलेश केंद्रे यांनी ईदगाहवर उपस्थित राहून मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.समाजात प्रेम, ऐक्य,बंधुता आणि सौहार्द कायम राहो,अशी भावना व्यक्त केली.या प्रसंगी नगरसेवक सुनील चौधरी, नगरसेवक शेख साबेर,माजी नगरसेवक रणधीरराजे भालेराव, अनीस खान,अन्वर खान,अमानुल्ला काका,नागनाथ साळवे,ॲड.सद्दाम खान आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मौलाना हाफीज वसीम नूरी म्हणाले की,ईद-उल-अजहा हा सण केवळ धार्मिक परंपरा नसून त्याग,समर्पण,मानवता आणि बलिदानाचा संदेश देणारा पवित्र सण आहे.या दिवशी प्रेषित इब्राहिम यांनी अल्लाहच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी आपल्या मुलाच्या बलिदानाची दिलेली तयारी त्याचवेळी अल्लाहने मुलाच्या जागी बकरीची कुरबानी स्वीकारली 

प्रेषित इब्राहिम यांच्या त्यागाची आठवण म्हणून बकरीची कुर्बानी दिली जाते.समाजात प्रेम,शांतता आणि परस्पर सहकार्य वाढविण्याची शिकवण हा सण देतो असे मार्गदर्शन केले तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे पालन करावे व समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत म्हणून शांतता राखण्याचे आवाहनही केले

यंदा वाढलेल्या उष्णतेचा विचार करून 

शहरातील मस्जिद मध्ये तसेच दोन्ही ईदगाह वर ईदच्या नमाजचे आयोजन सकाळी ८.१५ व ८.३० वाजता करण्यात आले होते.नमाज दरम्यान हजारो मुस्लिम बांधवांनी देशात शांतता,समता,बंधुता आणि एकात्मता नांदावी,अशी प्रार्थना केली.नमाजानंतर सर्व धर्मीय समाजबांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी गंगाखेड शहरात सामाजिक ऐक्य,प्रेम आणि बंधुभावाचे सुंदर दर्शन घडले.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here