


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.21मे):-नगर परिषद येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत वेतन वेळेवर नियमित करण्याचे निवेदन दिले असून या निवेदनात आजपर्यंत आपल्या कार्यालया तर्फे नियमिय सेवानिवृत्त वेतन प्राप्त झाले आहे. परंतु या आर्थिक वर्षात वेळेवर वेतन प्राप्त होत नसल्या मुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी समोर जावे लागत आहे. यात काही कर्मचारी डायबेडीज, हार्ट, काही कॅन्सर आशा आजाराशी पडीत असून त्यांना लागणारे औषध व या औषधीवर होणारा खर्च या वेताना वर आधारितच आहेत.
तसेच काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्ज घेतले असून त्याची परतफेड हप्ता याची मुदत महिण्याच्या 05तारखेला असते वेळेवर हप्ता नभरल्यास आर्थिक भुर्दंड आकारला जातो या सर्व गोष्टीचा सकारात्मक विचार करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करून दर महिन्याच्या 05तारखेला सेवानिवृत वेतन अदा करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी नगर परिषद गंगाखेड यांच्या स्वाक्षरी आहेत.















