


✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.20मे):-आदर्श विद्यार्थी चि.श्रीजीत अनिल वानरे ला एस.एस.सी. परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवून यशस्वी झाल्याबद्दल त्याचा सन्मानपत्र, रोख रक्कम व प्रा.अरुण बुंदेले लिखित ” आदर्श अभ्यासाचे तंत्र ” हे अभ्यासविषयक पुस्तक भेट देऊन कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान,अमरावती तर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान, अकोलाचे अध्यक्ष समाजप्रबोधनकार मा.प्रा. मुकुंद भारसाकळे,मा.प्राचार्य गजानन वानरे, मा.प्राचार्य गणेश बोरकर,सामाजिक कार्यकर्ते मा. तुषार खंडेराव यांनी नुकताच अमरावतीच्या सत्यकृपा कॉलनीतील अद्विक अपारर्टमेंट मध्ये केला. चि.श्रीजीत उपस्थित नसल्यामुळे हा सत्कार त्याचे वडील मा.अनिल लक्ष्मणराव वानरे व आई मा.सौ.सारिका अनिल वानरे यांनी स्वीकारला.
याप्रसंगी यशस्वीतेबद्दल चि.श्रीजीत अनिल वानरेचे सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांची कन्या कु.गौरी अनिल वानरे ने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वारंगल, (तेलंगणा स्टेट) येथून इलेक्ट्रिक & इलेक्ट्रॉनिक इंजिनियर हे शिक्षण घेतले असून आज ती मायक्रोसॉफ्ट कंपनी,हैदराबाद, येथे ” सॉफ्टवेअर डेव्हलपर “या पोस्टवर कार्यरत आहे.
मुलांच्या शिक्षणात आई-वडिलांचा, त्यांच्या संस्कारांचा, त्यांच्या मार्गदर्शनाचा खूप मोठा वाटा असतो.श्री अनिल लक्ष्मणराव वानरे व सौ .सारिका अनिल वानरे यांनी आपल्या मुलांना अतिशय चांगल्याप्रकारे घडविले व घडवित आहेत त्याबद्दल या आदर्श आई-वडिलांचे सुद्धा मान्यवरांनी अभिनंदन केले.
यशाचे श्रेय चि.श्रीजीत अनिल वानरे ने आई-वडील आणि गुरुजनांना दिले.















