Home महाराष्ट्र ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी गंगाखेड औषध विक्रेत्यांचा बंद

ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी गंगाखेड औषध विक्रेत्यांचा बंद

81

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.18मे):-अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (एआईओसीडी) यांच्या वतीने देशभरात (दिनांक २० मे बुधवार) रोजी अखिल भारतीय औषधी विक्रेता बंद पाळण्यात येणार आहे,गंगाखेड तालुक्यातील व शहरातील औषध विक्रेतेही या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती गंगाखेड केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे.बुधवारी दिवसभर औषधी दुकाने बंद राहणार असून अत्यावश्यक सेवेची गरज भासल्यास संघटनेचे अध्यक्ष व सचिव व अन्य पदाधिकारी सहकार्य करणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.या संदर्भात गंगाखेड उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांना दिनांक १८ मे सोमवार रोजी लेखी निवेदन देण्यात आले आहे.

इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून सुरू असलेली ऑनलाईन औषध विक्री,ई-पोर्टल तसेच जीएसआर ८१७(इ), दिनांक २८ ऑगस्ट २०१८ आणि कोविड काळातील जीएसआर २२०(इ) दिनांक २६ मार्च २०२० हे निर्णय मागे घेण्यात यावेत,अशी मागणी संघटनेने केली आहे.याबाबत अनेक वेळा संबंधित मंत्री व प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही शासनाची भूमिका नकारात्मक असल्याने देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्यातील औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होणार असून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाची प्रतही प्रशासनाला देण्यात आली आहे.

औषध विक्रेत्यांच्या मागण्या व भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात,अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.बंद काळात अत्यावश्यक सेवेची आवश्यकता भासल्यास तालुका संघटनेचे अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी सहकार्य करतील,असेही संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.दिलेल्या निवेदनावर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गुंडाळे,तालुकाध्यक्ष संदीप कोटलवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नंदकुमार भरड,शहराध्यक्ष कारभारी निरस,उपाध्यक्ष राधाकृष्ण राखे,सचिव अक्षय जैन,कोषाध्यक्ष बालाजी गुंडाळे,अनिल कलकोटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here