Home महाराष्ट्र 12 वी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा पुसद येथे संपन्न

12 वी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा पुसद येथे संपन्न

90

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.16मे):-कराटे खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा व मुला-मुलींना आत्मसंरक्षणाचे महत्व कळावे व ते शारिरीक दृष्ट्या सक्षम व्हावे या अनुषंगाने गेल्या 25 वर्षापासून बहुउद्देशीय सामाजिक संस्था द्वारा संचालित पॅन्थर ज्युडो कराटे असोसिएशन कार्य करत आहे.

दि. 10 मे 2026 रविवार रोजी पॅन्थर ज्युडो कराटे असोसिएशन द्वारे श्री. विश्वनाथसिंह बयास उच्च माध्य. शाळा पुसद येथे 12 वी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला 200 ते 250 मुला-मुलींनी आपला सहभाग नोंदविला होता.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून भवरसिंह सीसोदिया माजी बांधकाम सभापती, डॉ. अक्षय शिंदे, मानसरोग तज्ञ व भारतभाऊ जाधव, नगरसेवक पुसद हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून पिंटूभाऊ फुके, रावजी व्यायाम प्रसारक मंडळ पुसद, विठ्ठलराव खडसे, शिक्षण सभापती, न.प. पुसद, अनिलभाऊ जाधव, मुख्याध्यापक, विश्वानाथसिंह बयास उच्च माध्य. शाळा पुसद, सौ. अंशका मोहन गोरे (कांबळे) नगर सेविका पुसद हे उपस्थित होते. स्पर्धा सकाळी 9 वाजता सुरु करण्यात आली होती. या स्पर्धेत समाजाला जागृरुत करणाऱ्या व समाजाला नवी दिशा दाखविणाऱ्या समाजसेवक किशोरभाऊ कांबळे भिम टायगर सेना पुसद, बुध्दरत्न भालेराव, वंचित बहुजन आघाडी, पुसद, राजेशभाऊ ढोले, पत्रकार तथा समाजसेवक यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेला प्रथम ट्रॉफी यवतमाळ, उमरखेड मधून विलास भोसले यांचे टिमने नेली तर द्वितीय ट्रॉफी नेर मधून विजय सालोडे व तृतीय ट्रॉफी वाशिम चंद्रसेन इंगोले यांचे टिमने नेली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रसेन इंगोले यांनी केले, या स्पर्धेचे आयोजक पॅन्थर ज्युडो कराटे असोसिएशनचे सचिव संतोष कांबळे , गजानन मस्के , शिवराज कांबळे , आकाश मेश्राम हे यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here