


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.16मे):-बहुजन समाज पार्टीच्या चिमूर विधानसभा क्षेत्त्राची पुनरगठन बैठक शासकीय विश्रामगृह, चिमूर येथे जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे यांच्या नेतृत्वात उत्साहात पार पडली. बैठकीला महिला व पुरुषांसह सुमारे १०० कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी चिमूर विधानसभा कमिटी, चिमूर शहर कमिटी तसेच भिसी शहर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
बैठकीस जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे, चंद्रपूर लोकसभा प्रभारी धर्मेश निकोसे, जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ लाडे, जिल्हा महासचिव सुभाष पेटकर, जिल्हा कोषाध्यक्ष मनोहर बांबोडे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर राऊत तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य राहुल लांडे उपस्थित होते.
यावेळी चिमूर विधानसभा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. धर्मदास गेडाम यांची विधानसभा अध्यक्षपदी, आनंदराव शेंडे यांची उपाध्यक्षपदी, जागेश्वर मुलमुले यांची महासचिवपदी, कवडू निकेसर यांची कोषाध्यक्षपदी तर उमदेव गजभे व विनोद राऊत यांची सचिवपदी निवड करण्यात आली. तसेच प्रदीप मून व नाजूक मेश्राम यांची बीव्हीएफ संयोजक म्हणून नियुक्ती झाली.
चिमूर शहराध्यक्षपदी गिरधर मेश्राम, भिसी शहराध्यक्षपदी अनिल भीमटे तर शहर उपाध्यक्षपदी प्रशांत शेंडे यांची निवड जाहीर करण्यात आली. बैठकीत संघटन बळकटीसंदर्भात जिल्हा कमिटीने मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रामराव नन्नावरे यांनी केले.















