Home Breaking News शिकार केलेल्या प्राणी व पक्षासह 12 शिकारी वन विभागाचे ताब्यात 

शिकार केलेल्या प्राणी व पक्षासह 12 शिकारी वन विभागाचे ताब्यात 

792

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

आलापल्ली(दि.20एप्रिल):-आलापल्ली वन विभागाला दिनांक 19 एप्रिल रोज रविवार ला संध्याकाळच्या सुमारास सामुहिक जंगल गस्ती दरम्यान जंगलात शिकारी लपुन असल्याचे माहिती प्राप्त झाली असता त्यांना वन विभागाच्या गस्ती टिम द्वारे पाठलाग करुन पकडण्यात आले.

                                             एकुण 12 शिकारी ताब्यात घेण्यात आलेले असुन त्यांच्या कडुन चार पारध केलेले शेकरु (Ratufa indica), एक पारध केलेले उडनारी खार (Petaurista philippensis), एक पारध केलेले हरीयाल पक्षी (Treron phoeicopterus), एक पारध केलेले दयाळ प्रजातीचा पक्षी (Copsychus saularis), पाच दुचाक्या इत्यादी साहित्य वन विभागाने ताब्यात घेतलेले आहे.

                                           ताब्यात घेतलेल्या आरोपींवर भारतीय वन अधिनियम 1927, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे.

सदर कारवाही ही वनविभाग आलापल्लीच्या उपवनसंरक्षक सौ. दिपाली तलमले, आलापल्ली उपविभागीय वन अधिकारी शिषुपाल पवार यांच्ये मार्गदर्शनात आलापल्ली वन परिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांचे नेतृत्वात पार पाळण्यात आली.

या कारवाही मध्ये आलापल्ली उपक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक पुनमचंद बुध्दावार, नियत वनरक्षक दत्ता सुरवसे, निलेश टेकाम, सुधाकर सोयाम, वाहण चालक सुरेश मडावी, चौकीदार शाम जंजार्लावार, नानाजी मडावी, श्री. देवाजी सडमेक हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here