Home चंद्रपूर काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

89

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.6एप्रिल):– अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या संघटन सृजन अभियान अंतर्गत राजुरा विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज संकुल (सुपर मार्केट हॉल), राजुरा येथे पार पडलेल्या या बैठकीत राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक मा. संतोषजी कोलकोंडा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक मा. अभयजी छाजेड, प्रदेश उपाध्यक्ष याशिम शेख तसेच खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार मा. सुभाषभाऊ धोटे प्रमुख उपस्थित होते.

        बैठकीदरम्यान पक्ष संघटना अधिक मजबूत व सक्षम करण्यासाठी जिल्हा व ब्लॉक स्तरावरील विविध पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून नामांकन अर्ज स्वीकृत करण्यात आले. तसेच निरीक्षकांकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन संघटनात्मक रचनेबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीत आगामी काळात पक्ष संघटना अधिक गतिमान व प्रभावी करण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देणे, नव्या चेहऱ्यांना संधी देणे आणि जनसंपर्क वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.

         यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते दादा पाटील लांडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, राजुरा विधानसभा समन्वयक व नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, अँड. अरुणभाऊ धोटे, विठ्ठलराव थिपे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, राजीवसिंह चंदेल, महिला जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, रंजन लांडे, अशोक रेचनकर, डॉ. अंकुश गोतावळे यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस, सेवादल, अनुसूचित जाती-जमाती विभाग, इतर मागासवर्ग विभाग, अल्पसंख्यांक विभाग, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच सोशल मीडिया विभागाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here