Home चंद्रपूर मुक्या भटक्या प्राण्याकरिता दारापुढे पाण्याची व्यवस्था करा:डॉ नंदकिशोर मैंदळकर

मुक्या भटक्या प्राण्याकरिता दारापुढे पाण्याची व्यवस्था करा:डॉ नंदकिशोर मैंदळकर

99

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.5एप्रिल):-चंद्रपूर औद्योगिक शहर असल्यामुळे व त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे शहरातील वातावरण अधिकच तापू लागले आहे. मार्च महिन्यात अंगाची लाही लाही होत आहे. कडक व असहाय्य उन्हाळ्यात माणसाप्रमाणे प्राण्यांनाही थंड पाण्याची आवश्यकता असते. त्याचे चटके प्राण्याला जास्त सहन करावे लागतात. कारण मुक्या जनावराला त्याची गरज सांगता येत नाही.

गावात किंवा शहरात मुके प्राणी पाण्याकरिता,चाऱ्याकरिता वन वन भटकताना दिसतात तेव्हा आपले कर्तव्य समजून मूक प्राण्याविषयी भूतदया दाखवूया, त्याची भूक व तृष्णा भागविण्याकरिता आपल्या दारापुढे पाण्याने भरलेले भांडे ठेवा व आपल्या घरातील उरलेला भाजीपाला उकिरड्यावर न फेकता दारापुढे पेपरवर अथवा स्वच्छ जागेवर ठेवावा जेणेकरून भटके मुके प्राणी आपली भूक व तहान भागवू शकतील.

उन्हाळ्यात चारा पाण्या वाचून अनेक प्राण्यांचे प्राण जातात पाण्याच्या दुर्बीष्णतेमुळे जनावरे मृत्युमुखी पडताना दिसतात. अशा प्राण्यांची सेवा हीच ईश्वरीय सेवा होय मानवांची तृष्णा भागविण्याकरता पाणपोई लावतात मुक्या प्राण्याकरता चारापाण्याची व्यवस्था करून भूतदयेचा आत्मिक आनंद मिळवा. यात कर्तव्यातून परमार्थ घडविता येईल. असा आनंद विकतही घेता येणार नाही.आपले प्रयत्न एका मुक्या जीवाचे प्राण वाचवू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here