Home चंद्रपूर गोवरी येथील शुभम खवसे कुटुंबाचे घर आगीत जडून खाक

गोवरी येथील शुभम खवसे कुटुंबाचे घर आगीत जडून खाक

207

▪️घटनेसंदर्भात कळताच गावातील तरुण मदतीला सरसावले परंतु घरातील साहित्य पूर्णपणे आगीच्या विडख्यात खाक

▪️कुटुंबाला आधार म्हणून गावच्या सरपंच आणि शिवसेना नेते बबन उरकुडे यांच्याकडून आर्थिक मदत. 

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

 

राजुरा(दि.२२मार्च):-राजुरा तालुक्यातील गोवरी गावात शुभम खावसे नामक कुटुंबाच्या घराला आग लागून खूप नुकसान झाले. आगीचे कारण समजण्या अगोदरच गावातील तरुणांनी पुढाकार घेत घरातील स्फ़ोटक वस्तू बाहेर काढून संपूर्ण गावाचे नुकसान होण्यापासून वाचवले. एलपीजि सिलेंडर घरात असल्यामुळे स्फ़ोट होण्याची भीती होती परंतु गावातील काही तरुणांनी जीवाची बाजी लावत सर्व स्फ़ोटक वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतू उभ्या संसाराचे संपूर्ण साहित्य जडल्याने त्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

परिस्थिची बाजू समजून गावच्या प्रशासक सरपंच आशाताई उरकुडे आणि शिवसेना नेते बबन उरकुडे यांनी घटनास्थळी पाहनी करून कुटुंबाला आर्थिक मदत करत आधार देण्याचा प्रयत्न केला. आणि संबंधित विभागाला कळवत तलाट्याना चोकशीसाठी हजर राहण्यास प्रवृत्त केले. गावकर्यांनी या विषयी समाधान व्यक्त करत उरकुडे दांपत्याच्या या करायचे अभिनंदन केले.

याप्रसंगी रामदास पाचभाई , नागेश्वरजी ठेंगणे, मनोज वासाडे , गोविंद इटणकर, समीर इटकेलवार, अरुण पाचभाई, अक्षय नांदेकर , विकास पिंपळकर, अतुल ठाकूर, तुषार पाचभाई , राकेश पाचभाई , शुभम अहिरकर , केतन बोभाटे , अंकित अहिरकर, रोहित लोहे, राकेश शेंडे, गणेश वनकर, शुभम खवसे यांचे वडील हिरामण खवसे आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here