Home महाराष्ट्र दिव्यांगाना सन्मानाने जगण्याकरिता त्यांच्या मागण्यांची पूर्तता करा

दिव्यांगाना सन्मानाने जगण्याकरिता त्यांच्या मागण्यांची पूर्तता करा

178

▪️अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे विविध मागण्यांकरिता मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री यांना ई-मेलद्वारे-निवेदन

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.21मार्च):-दिव्यांग, निराधार, बेबस व लाचार व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभा राहता यावं व त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे व त्यांची पिळवणूक न होता समाजात त्यांना सन्मानाने जगता यावे याकरिता त्यांच्या खालील मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्यात यावी. यात प्रामुख्याने उदरनिर्वाह करिता मासिक मानधन भत्त्यात 10,000 हजार रुपयाची वाढ करण्यात यावी, भारतीय जनगणनेच्या कायद्यानुसार अपंगाची जनगणना करून निवडणुका मार्फत 10 टक्के प्रतिनिधित्व देण्यात यावे , त्याचप्रमाणे शासनाच्या विविध मंडळावर प्रतिनिधी अधिस्वीकृती देण्यात यावी ,दिव्यांगांना प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी.

दिव्यांगांना त्यांच्या पात्रतेनुसार स्वयंरोजगाराची गाडे उपलब्ध करून स्वयंरोजगारासाठी 2 लाखाची निधी उपलब्ध करून देण्यात यावी ,दिव्यांगांना मोफत घरकुल देण्यात यावे व शासकीय रित्या भविष्य निधीची तरतूद करण्यात यावी. या मागणीचे निवेदन अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार, अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे व भंडारा जिल्हाध्यक्ष नरेंद्र मेश्राम यांनी एका निवेदनातून ईमेल द्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट महाराष्ट्र शासन यांना ई-मेल द्वारे केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here