


▪️7 मार्च ते 8 मे या कालावधीत होणार शिबीर* नागरिकांनी मोठ्या संखेने शिबिरात सहभागी होऊन लाभ घेण्याचे केले आव्हान
✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.6मार्च):-महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार सर्वासामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागाअंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे, महाराष्ट्रात जमीन महसूल संहितेच्या नविन तरतूदिंची जनजागृती करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे, नागरिकांना एक दिवशीय शिबिरातून सेवा पुरविणे या उद्देशाने 7 मार्चला गोवरी गावातून सुरू सुरू होणाऱ्या शिबिरापासून तर राजुरातील 8 मे या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा क्र. 1) प्रभावीपणे राबविण्यात येत असून या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आव्हान उपविभागीय अधिकारी माननीय रवींद्र माने यांनी पत्रपरिषदेत केले . यावेळी तहसीलदार ओमप्रकाश गोंड, नायब तहसीलदार चंद्रशेखर तेलंग उपस्थीत होते
हे शिबीर पहिल्या टप्प्यामध्ये मंडळ स्तरावर गोवरी मंडळ अंतर्गत सात मार्च ला शिवाजी हायस्कुल गोवरी, विरूर मंडळ अंतर्गत चौदा मार्च तेलगू जिल्हा परिषद शाळा विरूर (स्टे.) देवाडा मंडळ अंतर्गत दहा एप्रिलला अब्दुल गणी विद्यालय देवाडा, राजुरा मंडळ अंतर्गत सतरा एप्रिल ग्रामपंचायत कार्यालय चुनाळा, आठ मे नगर परिषद कार्यालय राजुरा आणि पंधरा मे तहसील कार्यालय राजुरा येथे आयोजित केले आहे.
सदर अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. तसेच या शिबिरांद्वारे जनजागृती आणि प्रचार-प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे. ज्यांचे सातबारा दुरुस्ती, फेरफार दुरुस्ती, वर्ग दोनचे एक मध्ये परावर्तीत करणे, चावडी वाचन करणे, २०२४ पूर्वीचे तुकडेबंदी अंतर्गत असलेले सातबारा अद्यावत करणे, प्रलंबीत वारस नोंदी घेणे, सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज शिबिरापूर्वी भरून घेणे व शिबिरात लाभ देणे यांसह अन्य महसूल संबंधित कामे करून घेण्याचे आव्हान यावेळी मा. उपविभागीय अधिकारी रवींद्र माने व तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी केले आहे.यावेळी नायब तहसीलदार चंद्रशेखर तेलंग पत्रपरिषदेत उपस्थीत होते
बॉक्स. ह्या राजुरा उपविभागातील राजस्व अभियान शिबिरामध्ये राजुरा कोरपना जिवती या सबंध तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा असे कडकडीचे आवाहन यावेळी महसूल विभागाने केले आहे














