Home चंद्रपूर ग्रामगीता महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी

ग्रामगीता महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी

70

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी )

चिमूर(दि.23फेब्रुवारी):- ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. सुनंदा आस्वले व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. निलेश ठवकर, प्रा. डॉ. प्रणाली टेंभुर्णे उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. डॉ. सुनंदा आस्वले यांनी थोर समाज सुधारक, स्वच्छतेचे पुजारी, संत गाडगेबाबा यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अंधश्रद्धा निर्मूलन, वस्तीगृह तसेच शिक्षणाचे महत्व या विषयावर सुद्धा त्यांनी प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे, प्रा. डॉ. निलेश ठवकर यांनी सुद्धा संत गाडगेबाबा यांच्या कार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

या कार्यक्रमाचे आयोजन व संचालन प्रा. डॉ. सुमेध वावरे, समन्वयक, सांस्कृतिक विभाग यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. कु. प्रज्ञा खोब्रागडे यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here