Home महाराष्ट्र शिवजन्मोत्सव समिती गंगाखेडचा डॉ.गारोळे कुटुंबीयांच्या वतीने सत्कार

शिवजन्मोत्सव समिती गंगाखेडचा डॉ.गारोळे कुटुंबीयांच्या वतीने सत्कार

126

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.23फेब्रुवारी):-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजा शिवछत्रपती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती,गंगाखेड यांनी डीजे-डॉल्बीच्या गोंगाटाला फाटा देत अत्यंत शिस्तबद्ध,संस्कारक्षम आणि समाजाभिमुख पद्धतीने शिवजयंती साजरी करून शहरात आदर्शाचा नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.या उपक्रमामुळे गंगाखेड नगरीत सर्वत्र कौतुकाची व प्रेरणेची लाट उसळली आहे.या सर्व आदर्श उपक्रमांची दखल घेत समाजासाठी कार्य करणाऱ्या तरुणांना डॉ.के.पी.गारोळे इंटरनॅशनल स्कूलचे संस्थाचालक तथा प्रसिद्ध गॅस्ट्रोसर्जन डॉ.के.पी.गारोळे,स्कूलच्या संचालिका डॉ.किरण गारोळे यांनी आपल्या स्वगृही आमंत्रित करून शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सन्मानित केले.

या प्रसंगी डॉ.गारोळे यांनी रक्तदानाचे महत्त्व उपस्थितांना प्रभावी शब्दांत पटवून दिले.नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आलेले रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध समाजोपयोगी उपक्रम यामुळे जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण झाल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.उत्साह,शिस्त आणि समाजभान यांचा सुरेख संगम साधत शिवजयंती आनंदमय वातावरणात साजरी केल्याबद्दल अध्यक्ष गिरीधर सोळंके,उपाध्यक्ष गोपीनाथ लव्हाळे,सचिव मनोज शिंदे आदी सर्व पदाधिकाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार काढत सर्व आयोजक व शिवरायांच्या मावळ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here