Home महाराष्ट्र परिचारिकांच्या भविष्यासाठी “लोकचिकित्सा सामाजिक संस्थेचा” पुढाकार : अनिल जायभाये बीडकर

परिचारिकांच्या भविष्यासाठी “लोकचिकित्सा सामाजिक संस्थेचा” पुढाकार : अनिल जायभाये बीडकर

258

▪️आयोजक दुर्गादास आण्णा शिंदे यांचे यशस्वी नियोजन

▪️परिचारिकांनी घेतले निरंतर परिचर्या प्रशिक्षणाचे धडे……

✒️छत्रपती संभाजीनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

छत्रपती संभाजीनगर(दि.16फेब्रुवारी):-“रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा” मानणाऱ्या परिचारिकांनी बदलत्या काळासोबत आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान अवगत करणे काळाची गरज आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, भारतीय परिचर्या परिषद (INC) व महाराष्ट्र परिचर्या परिषद (MNC) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार “लोकचिकित्सा सामाजिक संस्थेच्या वतीने” ‘CNE/CPD’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .या प्रशिक्षणातून अनेक नर्सिंग स्टाफ यांच्या ज्ञानात मोलाची भर पडली आहे.

आधुनिक तंत्रज्ञान आणि संसर्ग नियंत्रण रुग्णालयीन वातावरणात रुग्णांची शुश्रूषा करताना संसर्ग टाळणे (Infection Control) हे सर्वात मोठे आव्हान असते. या कार्यशाळेत “Infection Control in Hospital Settings” या विषयावर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्टँडर्ड प्रोटोकॉल आणि आधुनिक उपकरणांचा प्रभावी वापर यावर विशेष भर देण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. शिवप्रसाद कासट आणि डॉ. प्रशांत हिरेमठ यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पीकर म्हणून शलाखा महाजन, डॉ. सागर तांबे, आणि लक्ष्मण गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नर्सिंग क्षेत्रातील नवनवीन आव्हाने आणि त्यावरील उपाय यावर प्रकाश टाकला. विशाल मोहिते यांनी प्रस्तावना केली, तर मयुरी लिखे यांनी सूत्रसंचालन केले.

अनेक परिचारिका बंधु भगिनीने उत्स्फूर्त प्रतिसाद देत या कार्यशाळेत संपुर्ण जिल्ह्यातून,शहर आणि परिसरातील तब्बल ३१९ परिचारिकांची उल्लेखनीय उपस्थिती होती. आयोजक दुर्गादास आण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने अत्यंत शिस्तबद्ध नियोजन केले. सोबतच दीपक आहेर, प्रसाद घुले, महेश निर्मल, अक्षय गायकवाड, वैभव सर, शलाका गायकवाड आणि शीतल शिंदे यांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

“अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे नर्सिंग स्टाफला जागतिक दर्जाचे वैद्यकीय, परिपुर्ण परिचर्या ज्ञान मिळते, ज्याचा थेट फायदा रुग्णांच्या दर्जेदार सेवेसाठी होतो.”

उत्कृष्ट प्रतिसाद आणि ज्ञानवर्धक सत्रांमुळे या कार्यशाळेने आरोग्य क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. शेवटी आयोजकांच्या वतीने सर्व सहभागी आणि मान्यवरांचे आभार मानण्यात आले अशी माहिती अनिल जायभये बीडकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here