


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
नागभीड(दि.16फेब्रुवारी):- ग्राम नागभीड येथे वर्षानुवर्षापासून सुरू असलेली परंपरा महाशिवरात्री च्या निमित्ताने दरवर्षी भरत असलेली यात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी असते पंचक्रोशीतील शिवभक्त या यात्रेमध्ये सहभागी होऊन पहाटेपासून शिवटेकडीवर येत असतात. उन्हाची तीव्रता लक्षात घेता भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये याकरिता विविध राजकीय संघटनांच्या माध्यमातून पाणपोई व नाश्ता वाटप असते, तसेच प्रशासनाने देखील उत्तम व्यवस्था केलेली असते. त्यामध्ये अखिल नागभीड तालुका प्राथमिक शिक्षक संघाने देखील दरवर्षी प्रमाणे यंदाही सामाजिक कर्तव्य जोपासत भाविक भक्तांसाठी सकाळपासून थंड पाणी व फळवाटप करून सामाजिक दायित्व सिद्ध केले.
या स्तुत्य उपक्रमाची दखल विविध राजकीय संघटना व प्रशासनाने घेऊन शिक्षकांच्या स्टॉलला भेटी देऊन त्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष- दिलीप चंदनबावणे, सरचिटणीस- राहुल कळंबे, तसेच अखिल संघाचे पदाधिकारी गजेंद्र जवंजाळ, मंगेश कोरे, अरुण दोईतरे,नंदा दुरबुळे, वत्सला ठाकूर, रेखा आकरे,मंदा हटवार मदन मरस्कोल्हे,गिरीश नगरे,नंदू मस्के, होमदेव नान्हे, मोहरकर,होमराज सलामे,किशोर कामडी, विजय भेंडारकर, नानाजी सहारे, प्रभाकर करंबे, रेवनाथ चिमुरकर,प्रशांत कोरे,महिपाल मांढरे,राजेश निमजे, मंगेश नौकरकर,संदीप कुंभरे, निकेश डोंगरे, रहांगडाले,तसेच समस्त संघ सैनिक यांनी अथक परिश्रम घेतले.प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सिंदेवाही व नागभीड यांनी विशेष सहकार्य केले.














