


▪️चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेच्या गुणपत्रिकेचे वितरण !….
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगांव(दि.16फेब्रुवारी):-शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दहावीचे वर्ग शिक्षक एस व्ही आढावे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शासकीय चित्रकला परीक्षा इंटरमिजिएट च्या गुणपत्रिकेचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले. शाळेतील उपशिक्षक एच डी माळी, पी डी पाटील, एस व्ही आढावे यांनी मुलांना एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेविषयी विस्तृत अशी माहिती सांगून मार्गदर्शक सूचना केल्या.
याप्रसंगी दहावीचे विद्यार्थी शितल भोई, वैभव माळी, भावना चंडाले, उमेश महाजन, यश जाधव यांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला व मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी दहावीच्या बॅच कडून शाळेला मोठे बॅनर भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार सर यांनी मुलांना बोर्डाच्या परीक्षा विषयी मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी डी पाटील तर आभार एस एन कोळी यांनी केले तर कार्यक्रमाला शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.














