


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.13फेब्रुवारी):-शहरातील डॉ.के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटरची इयत्ता नववीत शिक्षण घेणारी कु.वैभवी तुकाराम हुरगुळे हिने अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या होमी भाभा परीक्षेत तिसऱ्या लेव्हलसाठी पात्र ठरत गंगाखेडच्या शैक्षणिक इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. ही कामगिरी करणारी ती शहरातील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.वैभवीच्या या यशामागे तिचा सातत्यपूर्ण अभ्यास,जिद्द आणि डॉ. के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटरमधील सर्व फॅकल्टीज यांचे मार्गदर्शन लाभले. सेंटरच्या डायरेक्टर डॉ.किरण गारोळे तसेच सुप्रसिद्ध गॅस्ट्रो सर्जन डॉ.के.पी.गारोळे यांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाले.
या उल्लेखनीय यशानिमित्त दिनांक ११ फेब्रुवारी रोजी एज्युकेशन सेंटर येथे कु. वैभवी हुरगुळे व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. किरण गारोळे होत्या,तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.के.पी.गारोळे,ॲड.कुकडे, आवंके,प्रा.तुकाराम हुरगुळे,वर्षा हुरगुळे,शाळेचे प्राचार्य प्रा.एम.एम. सुरनर,उपप्राचार्य प्रा.जगदीश मंदोडे यांच्यासह ओम तिवारी,प्रवीण पाल, अश्विनी प्रजापती,वारीस अली,राकेश कहार,हरी कराळे,राजू चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपल्या मनोगतातून वैभवीच्या यशाचे कौतुक करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.किरण गारोळे आणि डॉ.गारोळे यांनी वैभवी आणि सर्व फॅकल्टीज यांच्या अथक परिश्रमांचे हे फलित असून, भविष्यातही आपल्या सेंटरमधून असे अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांत यश संपादन करतील,असा आशावाद व्यक्त केला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सुरनर यांनी केले,तर आभार प्रा.तुकाराम हुरगुळे यांनी मानले.या उल्लेखनीय यशामुळे डॉ.के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटरने गंगाखेडच्या शैक्षणिक क्षेत्रात गरुड झेप घेतल्याची भावना व्यक्त होत आहे.














