Home महाराष्ट्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट,मफरेल व खाऊ वाटप

लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट,मफरेल व खाऊ वाटप

188

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.12डिसेंबर):-लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त (दिनांक 12 डिसेंबर,शुक्रवार) रोजी शहरातील प.पू.पुरुषोत्तम महाराज निवासी मतिमंद विद्यालयात मा.नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्या वतीने अत्यंत मनोभावे सेवा उपक्रम राबविण्यात आला.विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना उबदार ब्लॅंकेट, मफरेल तसेच स्वादिष्ट खाऊचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटवण्यात आली.

मतिमंद विद्यालयातील विद्यार्थी हे निरागस, प्रेमळ आणि संवेदनशील मनाचे असल्याचे सर्वांच्या अनुभवातून दिसून येते. थोडे मार्गदर्शन, सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाल्यास तेही स्वतःच्या क्षमतेनुसार उत्कृष्ट प्रगती साधतात. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलेली विशेष कला, गुण आणि क्षमता ओळखून योग्य दिशेने विकसित करणे गरजेचे आहे. त्यांच्या निरागस हास्यमधून जीवनातील खरी सकारात्मकता आणि आनंद अनुभवास येतो.

या सेवा उपक्रमासाठी मा. नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे,हिराजी मेहता,दीपक फड,हनुमान मुंडे,देवानंद जोशी,ओम जवळकर तसेच विद्यालयातील शिक्षकवर्ग उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीने व सहभागाने कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी ठरला.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त केलेला हा उपक्रम म्हणजे सामाजिक बांधिलकीची जाणीव जपणारा आणि विद्यार्थ्यांप्रती मायेचा हात देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here