


✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(सातारा)(दि.8डिसेंबर):-अग्रणी संस्थेची मासिक बैठक पार पडली त्यामध्ये संस्थेचे पदाधिकारी अध्यक्षा शोभाताई लोंढे, संचालक गणेश धेंडे,संघटक शकील काझी, सल्लागार शैलजा भिंगारदेवे,मंगल भादुले,संघटिका लता तंवर तसेच समता फेलो सविता काकडे, नंदाताई खैरमोडे, मंदा सोनताटे,वींग फेलो सलिमा शेख,डीएनटी फेलो सुहासिनी शिंदे हे सदस्य उपस्थित होते.ही बैठक संचालिका सुनिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.सुरूवातीला नंदाताई खैरमोडे यांनी संविधान गीत सादर व सुनिता कांबळे यांनी संविधान प्रास्ताविका वाचन केले.तर त्यानंतर
फेलोशिपसाठी निवड झालेल्या लिडर्स व विटा नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी केलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
जानेवारी महिन्यात कोरो संस्थेकडून राज्यव्यापी कबड्डी स्पर्धा होणार आहे.त्यासाठी सविता काकडे यांच्या नेतृत्वाखाली शोभाताई लोंढे, सुहासिनी शिंदे,लता तंवर,सलिमा शेख, सुनिता कांबळे, मंदाताई सोनताटे,संघ व्यवस्थापक शैलजा भिंगारदेवे या टिमची निवड करण्यात आली.त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या भावी काळात कामाबाबत, बैठक व सभासद नोंदणीसाठी रणनितीवर आपले मनोगत व्यक्त केले.जानेवारी महिन्यात ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते १२ जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती दरम्यान दशरात्रोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले.यावेळी संचालिकेच्या कार्यक्षेत्रातील एका गावात प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
तसेच प्रत्येक वेगवेगळ्या बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या महानायिकांचे यावेळी स्मरण करण्यात येणार आहे.यामध्ये खानापूर,वलवण,धावडवाडी,बेलवडे,तुपेवाडी,नेवरी,बेनापूर, आंबेडकरनगर,लेंगरे रोड,करंजवडे या ठिकाणी महिला जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.तर क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मृतिदिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीचा सत्यशोधक शिक्षकप्रेरणा पुरस्कारा एस.एम.कॉलेज खानापूरचे प्राध्यापक गावडे सर तर धावडवाडी ता.जत येथील माध्यमिक शिक्षक काळे सर यांची निवड करण्यात आली आहे.या पुरस्काराचे ३ जाने. रोजी खानापूर येथे वितरण करण्यात येणार आहे.तर संस्थेचे सचिव व डिसोम फेलो मुनीर शिकलगार यांच्या
ड्रीम मिशन- प्रोजेक्टबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली.शिकलगार यांनी सत्यशोधक ग्रासरूट नेतृत्वविकास व संशोधन अकादमी यांचे वतीने २०४० पर्यंत सांगली जिल्ह्यातील वंचित घटकातील राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात कार्य करणारे ८८ लिडर्स तयार करण्याचा संकल्प केला आहे.तसेच २० जाने.रोजी धावडवाडी ता.जत येथे सलिमा शेख यांच्या सीएससी सेंटरचे उद्घाटन,गावची जत्रा व संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई लोंढे यांचा वाढदिवस असा कार्यक्रम आयोजित केला आहे.त्यासाठी सर्व सदस्यांना निमंत्रित केले आहे.शेवटी बैठकीच्या अध्यक्षा सुनिता कांबळे यांनी आभारप्रदर्शन करून बैठकीची सांगता केली.














