


✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.8डिसेंबर):-महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर चा २५ वा वर्धापन दिवस दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी माफसू अंतर्गत असलेल्या संलग्न महाविद्यालयामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्य विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्य विद्यापीठाअंतर्गत दिनांक २ व ३ डिसेंबर २०२५ रोजीआंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धांचे, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे आयोजन करण्यात आले होते.
या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय यांच्या चमूने नेत्रदीपक खेळ दाखवत चुरशीच्या अंतिम सामन्यात उपविजेतेपद जिंकले.
या स्पर्धेत उपविजेता असूनही क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय यांच्या संघाने उत्कृष्ट खेळ दाखवला. डॉ विठ्ठल धायगुडे याना ‘सर्वात मौल्यवान खेळाडू’ व डॉ तेजस शेंडे याना आणि ‘सर्वोत्कृष्ट फलंदाज’ ‘ हे पुरस्कार मिळाले. उत्कृष्ट खेळून महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करून उपविजेतेपद मिळवल्याबद्दल डॉ विकास वासकर, सहयोगी अधिष्ठाता, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर वर्ग, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.














