


✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.20नोव्हेंबर):-मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, निर्मिती विचारमंच, आम्ही भारतीय महिला मंच, निर्मिती फिल्म क्लब यांच्या वतीने आयोजित बहुजन-कष्टकरी चळवळीचे कामगार नेते, दिशादर्शक विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी सोमवार दि. 24 नोव्हेंबर 2025 रोजी सायं. 5:00 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, मिनी सभागृह, कोल्हापूर या ठिकाणी ‘कविता इन्कलाबी’ हा परिवर्तनवादी, प्रागतिक विचारांच्या काव्य मैफलीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
कवी व दिग्दर्शक अनिल म्हमाने यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या ‘कविता इन्कलाबी’ मध्ये कवठेमहांकाळचे विद्रोही दंगलकार कवी नितीन चंदनशिवे, आंबेडकरवादी कवी व शाहीर रणजित कांबळे, सोलापूरचे कवी व निवेदक दत्ता थोरे सहभागी होणार आहेत.
सदर कार्यक्रमाचे अंतिमा कोल्हापूरकर, गंगाधर म्हमाने
अर्हंत मिणचेकर, सिद्धार्थ कांबळे निमंत्रक असून भरत लाटकर, सुनील जाधव, डॉ. कपिल राजहंस, प्रा. टी. के. सरगर, डॉ. शोभा चाळके, ॲड. करुणा विमल, विश्वास तरटे, अभिजीत मासुर्लीकर यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अर्हंत मिणचेकर यांनी केले आहे.














