


✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील)
धरणगांव(दि.15नोव्हेंबर):-शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे आदिवासींच्या हक्कासाठी ब्रिटिश साम्राज्याशी लढा देणारे, आदिवासींचे जननायक, आपल्या क्रांतिकारी विचारातून समाजाला दिशा देणारे, स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारी योद्धा, महान क्रांतिकारक,धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पी डी पाटील यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते मान्यवरांच्या हस्ते महानायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पवार यांनी आदिवासी जननायक, क्रांतिकारी योद्धा बिरसा मुंडा यांचे जीवन कार्य विद्यार्थ्यांना विस्तृत सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार व्ही टी माळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.














