


✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
▪️नगराध्यक्ष पदासह केले आठ उमेदवारी अर्ज दाखल
म्हसवड(दि.15नोव्हेंबर):-म्हसवड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात अनेक चर्चाना उधान आले असताना आणि गेली चार दिवस एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसताना शेखर गोरे गटाने अनपेक्षित पणे शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदासह आज सात उमेदवारी अर्ज दाखल करून बाजी मारली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दहा नोव्हेंबर पासून सुरुवात झाली परंतु कोणत्याही पक्षाचा एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता त्यामुळे शहरामध्ये वेगळ्याच प्रकारची चर्चा चालू होती भाजपाकडून काहीच हालचाल झालेली पाहायला मिळत नव्हती आणि विरोधी गट पण उमेदवारी अर्जसाठी चालढकल करत असताना शेखर गोरे गटाने बाजी मारत आपल्या हजारो समर्थकच्या उपस्थितीत शक्ती प्रदशन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.
शेखर गोरे हे माण तालुक्यातील राजकारणात एक डेंशिंग नेतृत्व म्हणून परिचित आहेत त्यामुळे आज स्वतः हजर राहत उमेदवारी अर्ज दाखल केले असल्यामुने आता निवडणुकीत मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.
शेखर गोरे यांनी अचानक म्हसवडच्या राजकारणात धडाकेबाज एन्ट्री करीत पहिल्या टप्प्यात 8 उमेदवारांचे अर्ज दाखल केले.
यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी येथील माजी नगराध्यक्ष विलासराव माने यांच्या सुनबाई सौ. गौरी विशाल माने यांचा अर्ज दाखल केला आहे, तर इतर प्रभागातुनही आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत, यामध्ये प्रभाग क्र. १ मधुन सोमनाथ अजिनाथ कवी, प्रभाग क्र. २ ट मधुन किर्ती आनंदा मासाळ व त्याच प्रभागातुन त्यांचे पती आनंदा महादेव मासाळ, प्रभाग क्र. ३ विक्रम लोखंडे, प्रभाग क्र. ५ मधुन मोनिका महेश लिंगे, प्रभाग क्र. ७ मधुन प्रतिक्षा सोमनाथ कवी, प्रभाग क्र. ८ मधुन धनाजी रामचंद्र माने अशा ७सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले आहेत.

आजपासुन निवडणुकीला रंग भरायला सुरुवात झाली असून आता शेखर गोरे गट कोणाचे समीकरण बदलवणार हे निकालादिवशीच कळणार आहे.














