


‘मी सम्यकदर्शी आहे का?’ असा प्रश्न स्वतःला विचारा. संसारात राहून मी पापांपासून स्वतःचा बचाव करू शकतो. संसार समस्यांचे आगार आहे. बालपणी समज नसते, तरुणपणी इंद्रियांची तृप्ती नसते. वृद्धत्वात ताकद नसते. सकाळी लवकर उठाणे होत नाही पहाटेची साखरझोप उघडत नाही. दुपारी कामांमुळे क्षणाचीही उसंत किंवा सवडच मिळत नाही. रात्री झोप लागत नाही अशी काहीशी विचित्र परिस्थिती आजच्या संसारी व्यक्तींची असते. रात्री १० वाजता झोपायचे असेल तर लवकर दिवे विझवा, मोबाईल पासून दूर रहा. हे करणे अगत्याचे ठरते परंतु असे होऊ शकत नाही. खरे पाहिले तर आपणच आपल्या जीवनशैलीत बिघाड करून ठेवला आहे. आजचा आपला माणूस स्वतःला मालक समजू लागलेला आहे, जणू तो पृथ्वीवर कायम स्वरुपी आलेला आहे असा त्याचा अविर्भाव असतो.
परंतु ‘स्वतःला पाहुणा व घराला धर्मशाळा मानले पाहिजे…’ या ऐका वाक्याला कायम ध्यानात ठेवायला हवे तरच संसारात राहून देखील पापापासून बचाव करू शकतो. असे अत्यंत महत्त्वाचे विचार प.पू. डॉ. श्री हेमप्रभाजी म.सा. ‘हिमांशू’ यांनी आजच्या प्रवचनातून व्यक्त केले. तुम्ही आज उठावण्यात सहभागी होतात, उद्या तुमच्या उठविण्याला लोक सहभागी होतील, मृत्यूपूर्वी सत्कर्म करावे याबाबतचे विचार देखील प्रवचनात मांडले गेले. पालीतना तीर्थस्थळी कालवश झालेल्या सौ. वंदना बोथरा यांचा उठावणा स्वाध्यायभवन येथे झाला त्या प्रसंगी त्यांनी श्रावक-श्राविकांना उद्देशून सांगितले. संजय ललवाणी यांचाही उठावणा होता. सम्यक ज्ञान, दर्शन आणि चारित्र्य हे जसे महत्त्वपूर्ण त्याचप्रमाणे मुक्तीचे दान, शील, तप आणि भाव हे चार मार्ग सांगण्यात आले आहे. ‘भाव बिना क्रिया शून्य’ या वाक्यातून ‘भाव’ महत्त्वाचे आहे. दोन गोष्टीत ‘भाव सामाईक’, ‘भाव प्रतिक्रमण’ महत्त्वाचे ठरलेले आहेत.
आजच्य प्रवचनात ‘समकीत के ६७ बोल’ या श्रृंखलेत ‘भाव’ किंवा सम्यकत्त्व भाव याबाबत मोलाचे विचार मांडण्यात आले. चंपा नगरीच्या सुभद्रासतीचे उदाहरण प्रस्तुत केले. सम्यकत्वाचा दरवाजा खुला असावा. ज्याला सम्यकत्व असते तो ज्ञानी असतो. सम्यकत्व म्हणजे एक म्हणू शकतो. एक नंतर शून्य असेल तर त्या एकाचे मूल्य वाढत असते. आज जे सुख, दुःख भोगत असतो ते पूर्वी केलेल्या कर्माचे फळ आहे. सम्यकत्व सुदृढ करण्यासाठी, सम्यकत्व भावना हृदयात येण्यासाठी जिनवाणी, स्वाध्याय करणे खूप आवश्यक असते. आपली भावना शुद्ध ठेवायला हवी असे आवाहन प. पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनात केले.(ऑक्टोबर २९: २०२५ जळगाव, महाराष्ट्र)
✒️शब्दांकन:-किशोर कुलकर्णी(मो:-9422776759)














