


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566516
गंगाखेड(दि.30ऑक्टोबर):-तालुक्यातील मुळी या गावात पांदण रस्त्या वरून तिरडी नेत असताना विटंबना होत असल्या बद्दल तहसील कार्यासमोर अमरण उपोषण करावे लागत आहे मौजे मुळी येथील स्मशानभूमी सामाजिक विकास योजनेअंतर्गत एक किलोमीटर अंतरावर बांधली असता गावातून मृत महिला/ पुरुष यांना पांदण रस्त्यांमधून जाताना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे गावातील उपोषण करते कसबे यांनी वेळोवेळी निवेदन देऊनही रहदारी करिता पादन रस्ता बनवण्यात आला नाही त्यामुळे मृत झालेली डेट बॉडी रस्त्यामधून पडल्या नंतर विटंबना होत आहे.
असे निवेदनावर उपोषण करते कसबे यांनी कळविले आहे. मुळी हे गाव गोदावरी नदीच्या काठावर असल्यामुळे दलित स्मशानभूमी गावाच्या एक किलोमीटर अंतरावर असल्यामुळे भर पावसातही पादन रस्ता अत्यंत खराब रस्त्यामध्ये सरळ चालता येत नाही त्यामुळे डेट बॉडीची विटंबना होते.अंत्यविधी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असतानाच दलित स्मशानभूमीची अवकाळा पाहता ग्रामपंचायत सदस्य कसबे यांनी जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींना आपल्या गावाची दयनीय अवस्था पालकमंत्री,आमदार, समाज कल्याण अधिकारी,सामाजिक न्याय विभाग मुंबई यांनाही पत्रव्यवहार करूनही गावातील दलित स्मशानभूमीची अवकळा बदलत नसल्याचे निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य कसबे यांनी कळविले आहे.
मृत व्यक्तीलाही मेल्यानंतर यातना होत असतील तर प्रशासन जागे होईल का..? गोरगरिबांना जीवनपणी यातना असतातच परंतु मेल्या नंतरही पांदन रस्त्यामध्ये डेड बॉडी खांद्यावरून खाली पडते..? खरंच ” चलो विकास की और ” म्हणणारे लोकप्रतिनिधी मुळी गावातील स्मशानभूमी दयनीय अवस्था पाहतील का..?














