Home महाराष्ट्र स्टेला मेरिस काॅन्वेंट स्कूलच्या खेळाडूंची राज्य स्तरीय शालेय बुद्धिबळ, सायकलींग आणि स्क्वॅश...

स्टेला मेरिस काॅन्वेंट स्कूलच्या खेळाडूंची राज्य स्तरीय शालेय बुद्धिबळ, सायकलींग आणि स्क्वॅश क्रीडा स्पर्धेसाठी निवड

172

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.16ऑक्टोबर):-विभाग स्तरीय शालेय बुद्धिबळ, सायकलींग व स्क्वॅश क्रीडा स्पर्धेत बामणवाडा, राजुरा येथील स्टेला मेरिस काॅन्वेंट स्कूलच्या खेळाडूंची राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेकरिता निवड झाली आहे. क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद नागपूर तथा नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने रायसोनी इंजिनिरींग काॅलेज, नागपूर येथे पार पडलेल्या विभाग स्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत शाळेच्या १७ वर्षांखालील मुलिंच्या गटात कु. अक्षरा राजू गोरपाटी हिने पाचवा (५वा) क्रमांक पटकाविला, या स्पर्धेत नागपूर विभागाच्या ३९ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

ती सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तालुका क्रीडा संकुल देवरी, गोंदिया येथे पार पडलेल्या विभाग स्तरीय शालेय सायकलींग क्रीडा स्पर्धेत शाळेच्या १४ वर्षांखालील मुलांच्या गटात नरेंद्र पिंगे याने ५ किमी मास स्टार्ट या क्रीडा प्रकारात ११:४५ मिनिटांमध्ये अंतर पूर्ण करित द्वितीय क्रमांक पटकावला तर ओम पिंपडकर यांनी ५ किमी टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात १२:३० मिनिटांमध्ये अंतर पूर्ण करित तृतीय (३रा) क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील मुलिंच्या गटात कु अनुष्का भास्कर फरकाडे हिने १० किमी टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात २८:१० मिनिटांत अंतर पूर्ण करून तृतीय (३रा) क्रमांक पटकावला. नरेंद्र पिंगे यांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय सायकलींग क्रीडा स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे पार पडलेल्या विभाग स्तरीय शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धेत शाळेच्या १४ वर्षांखालील मुलांच्या गटात हिमांशू उरकुडे यांनी चतुर्थ (४था) क्रमांक पटकावला. तो औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री भास्कर फरकाडे यांचे मार्गदर्शन मिळाले.

खेळाडूंचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जाॅयल डि.एम. सि. सजिवा डि.एम. सि. लुशी डि. एम. र्फान्सीन डि. एम. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, संदिप उईके, मोरेश्वर गायकवाड, नंदकिशोर आवारे, मनोज पंधराम, विजय ढोबाळे , संघटनेचे सचिव डाॅ. राकेश तिवारी, अश्विन मुसळे, दिलिप बिश्वास, तालुका क्रीडा संयोजक हरिश्चंद्र विरूटकर, किशोर चिंचोलकर, बादल बेले, हर्षल क्षीरसागर , सचिन उपरे, पुर्वा खेरकर, भार्गवी कोडाली, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, खेळाडूंचे पालक आदींनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here