Home चंद्रपूर राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव संपन्न 

राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव संपन्न 

276

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428)l

 राजुरा(दि.१६ऑक्टोबर):- राष्ट्रसेविका समिती राजुरा शाखेचा विजयादशमी उत्सव येथील संघस्थानावर संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून छाया मोहितकर तर प्रमुख वक्ता म्हणून अपर्णा घाटे उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख अतिथी अपर्णा घाटे म्हणाल्या की , महिला सबलीकरण बरोबर महिलांनी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने राष्ट्रसेविका समिती बालवयापासूनचे स्त्रीयांना आत्मसंरक्षणाचे धडे देत आहे.

येणाऱ्या काळात स्त्रीयांनी इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच परीपूर्ण व्हावे असे मत व्यक्त केले. यावेळी ध्वजारोहण साक्षी भाटे तर समितीची प्रार्थना, सांघिक गीत विणा देशकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नगर कार्यवाहिका श्वेता अपराजित यांनी केले.

या कार्यक्रमाला सीमा देशमुख, शशीरेखा देशमुख, उज्ज्वला जयपूरकर, नंदिनी देशमुख, नम्रता खोंड, सीमा देशकर, शुभांगी वाटेकर, स्वरुपा झंवर, प्रणाली मारोटकर, प्रिया राणिंगा, स्नेहा साईनवार , प्रिती समर्थ, किरण नैताम, मीरा कुलकर्णी , कल्पना, वेदिका राचलावार , अनन्या समर्थ, अदिती रामगिरवार, सिध्दी अग्रवाल, चिट्टी आक्केवार आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here