


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.14ऑक्टोबर):-वंचित बहुजन आघाडी परभणी दक्षिणची नवनियुक्त कार्यकारिणी दिनांक ११ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे जिल्हा समन्वयक तथा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आशोक सोनोने,भिमराव तायडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारणी निवडीसाठी शासकिय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांची बैठकी घेऊन मुलाखती घेण्यात आल्या होत्या या मुलाखतीचा आढावा प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्याची नवनियुक्त जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात आली पक्षाचे महासचिव किसन चव्हाण यांच्या स्वाक्षरीने परभणी जिल्हा दक्षिणच्या जिल्हा महासचिवपदी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा लातूर जिल्हा पक्षनिरीक्षक शुध्दोधन सावंत यांची निवड करण्यात आली तर जिल्हा उपाध्यक्षपदी कृष्णा सावंत यांची निवड करण्यात आली आहे निवडी बदल सर्व स्तरातून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे














