


*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
*आढावा बैठकिनंतर लगेच आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते शुभारंभ*
राजुरा : येथील भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात पदवीधर मतदार नोंदणीसंदर्भात राजुरा विधानसभा मतदार संघातील भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि लगेच पदवीधर मतदार नोंदणीचा शुभारंभ नितीन पावडे यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थित आपला फॉर्म भरून शुभारंभ केला. यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी सांगितले की, राजुरा विधानसभा क्षेत्रातून जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी केली जाणार असल्याचे सांगितले.
या आढावा बैठकीत आगामी २०२६ पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदार नोंदणी मोहिमेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करीत “पदवीधर वर्ग हा सुशिक्षित आणि जागरूक मतदार वर्ग आहे. त्यांच्या सहभागाने लोकशाही अधिक मजबूत होते. त्यामुळे एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.असे आव्हान आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
यावेळी चंद्रपूर येथून आलेले राजेंद्र गांधी, भाजपचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, राजुरा तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, शहराध्यक्ष सुरेश रागीट, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष दीपक सातपुते, जिवती तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, जिल्हा उपाध्यक्ष सुनील उरकुडे, महामंत्री दिलीप गिरसावळे, मिलिंद देशकर, सचिन भोयर, अजय राठोड, राजेश राठोड, मंगेश श्रीराम, दीपक झाडे, ओम पवार, स्वप्नील राजूरकर, सागर भटपल्लीवार व राजुरा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.














