Home चंद्रपूर विजय गणोरकर यांची खाजगी मान्यताप्राप्त कायम विनाअनुदान तत्त्वावरील खाजगी अध्यापक विद्यालयाच्या शुल्क...

विजय गणोरकर यांची खाजगी मान्यताप्राप्त कायम विनाअनुदान तत्त्वावरील खाजगी अध्यापक विद्यालयाच्या शुल्क निश्चिती प्राधिकरणावर निवड

105

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

 

– विदर्भ विभागातून प्राचार्य विजय गणोरकर यांची निवड

 

 

राजुरा (२८ सप्टेंबर)-विनाअनुदानित अध्यापक विद्यालयाच्या (डी.एड.) वार्षिक शुल्क वाढ प्राधिकरणावर विदर्भ विभागातून श्रीकृष्ण अध्यापक विद्यालय,सावनेर जिल्हा नागपूर चे प्राचार्य विजय गणोरकर यांची विदर्भ विभागातून निवड झाली. विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर डॉ. माधुरी सावरकर यांनी ही निवड केली. विजय गणोरकर हे अखिल महाराष्ट्र विना अनुदानित अध्यापक विद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य अध्यापक विद्यालय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहेत. शासन निर्णय २२ मे २००३ मधील मुद्दा क्रमांक १ नुसार शुल्क विनीम प्राधिकरणावर विदर्भ मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र असे एकूण तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक होते त्यानुसार विभागातील खाजगी विनाअनुदानित अध्यापक विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांशी समन्वय साधून खाजगी मान्यताप्राप्त कायम विनाअनुदान तत्त्वावरील खाजगी अध्यापक विद्यालयाच्या शुल्क निश्चिती प्राधिकरणावर नागपूर विभागातून प्राचार्य विजय गणोरकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल भारत रंगारी अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र विना अनुदानित अध्यापक विद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, राजेश क्षीरसागर उपाध्यक्ष , भीमाशंकर सारणे , उमरगा मंजुषा ठवकर , अल्का बालपांडे , शिरीष खोबे, दत्तात्रय जगताप यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here