


भाजप युती ला समर्थन दिलेले आमदार, मंत्री जर आपल्या गावात आले तर आधी प्रश्न करा.
का हो ! विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. या प्रलोभनाला भुलून आम्ही शेतकऱ्यांनी चोर, नालायक उमेदवारांना मतदान केले. बहुमत मिळवून दिले. सरकार बनले. आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आश्वासन विसरून गेले.
तर मग फडणवीस यांचा पाठिंबा भाजप आमदार तसेच शिंदे सेनेचे आमदार, अजित पवारांचे आमदारांनी काढून घेतला पाहिजे. मुख्यमंत्री खोटे बोलले. तर आमच्या मतदारसंघात मतदार आम्हाला प्रश्न करीत आहेत. का हो, आमदार साहेब, कर्जमाफी करणार कधी?
आम्ही सांगतो, थांबा करतो! थांबा करतो! असे सांगून वेळ मारून नेली. आता सहा महिने झाले. तरीही कर्जमाफी करीत नाहीत. आता लोक ऐकून घ्यायला तयार नाहीत. एकतर शेतकरी आधीच विचार करीत नाहीत. आणि वरून फसवले गेलेले आहेत. त्यांची जर सटकली तर आम्हाला भर रस्त्यात हाणतील.
फडणवीस साहेब आता आम्हाला गावात फिरणे अवघड झाले आहे. बायको म्हणते, चुलीत गेले तुमचे सरकार आणि होळीत घाला तुमचा तो लबाड फडणवीस. पण तुम्ही बाहेर जाऊ नका. काही भाषणे ठोकू नका. लोक तुम्हाला ठोकतील.
तेरी दो टकियोकी नोकरी जाये ,
मेरा लाखोका सावन न जाये.
हाय हाय !ये है मजबूरी!
ये साजन और ये चोरी!
आम्ही बायकोला कसे बसे चूप बसवतो. पण पुन्हा पुन्हा विचारते. का हो! मला तर इतका खर्च लागत नाही. मग तुम्ही इतका पैसा चोरतात कोणासाठी? काही दुसरी बाई केली आहे का तिकडे मुंबई पुण्यात? तुमचा राग रंग मला बरा दिसत नाही.
फडणवीस साहेब, तुम्हीच सांगा. बायकोला कशी समजूत घालावी?जसे तुमचे तसे आमचे. मला तुम्हाला मोदींचा हेवा परवडणारा नाही. आजच कमरेचे सोडून डोक्याला बांधता येणार नाही.
फडणवीस साहेब, आम्हाला आता तर शंका येते. हे पोलिस सुद्धा शेतकऱ्यांची मुले आहेत. शेतकऱ्यांनी हल्ला केला आणि पोलिसांनी अंग काढून घेतले तर लोक आमचा चेंदामेंदा करतील. पोलिसांचा काय भरोसा? शेतकरी दणका मारतील आणि पोलिस मुतायला बसतील. आता पोलिस साधे भोळे राहिलेले नाहीत.
फडणवीस साहेब, तुम्ही आतापर्यंत मोदी सारखे खोटे बोलून बोलून निवडणूक जिंकली. पण यापुढे मार खावा लागेल. आता जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही खेड्यात भाषणाला गेलो तर हेल्मेट घालून भाषण करावे लागेल. तरीही खेड्यातील लोकांचे काही सांगता येत नाही. हे लोक तोंडावर गोधळी टाकून झोडपतात. तसे आम्हाला गोधळी टाकून झोडपले तर सर्व कमावलेले कोण खाईल? कसली बाई आणि कसली बाटली? ना घरवाली ना बाहरवाली! जर अशी टाळकी फुटली तर! कालच गिरीश महाजन यांची गाडी शेतकऱ्यांनी अडवली. जर शेतकऱ्यांनी हात उचलला असता तर बायकोने कोणाच्या तोंडाकडे पाहिले असते? बिचारीची तिची काय चूक?म्हणजे चोरी नवऱ्याने करावी आणि फळे बायकोने भोगावी का?
अहो फडणवीस साहेब. काहीपण करा पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. तिजोरीत पैसे नसतील तर आम्ही आतापर्यंत जे चोरलेले आहेत त्यातून काढून देतो. एकटे गुलाबराव एक हजार कोटी काढून देतील. एकटे महाजन दोन हजार कोटी काढून देतील. एकटे अजित पवार सत्तर हजार कोटी काढून देतील. पैसे गेले तर चालतील. पुन्हा कमवून घेऊ. चोरी करणे आमच्या हातचा मळ आहे. आम्ही तुमचेहि डोळे बांधून चोरी करू शकतो. आतापर्यंत इतकी चोरी केली तशी पुढे पण करू शकतो.पण “जान बची तो लाखो पाये!”
शिवराम पाटील, महाराष्ट्र जागृत जनमंच, मो. ९२७०९६३१२२














