Home चंद्रपूर २०२७ मध्ये चिमूर जिल्हा होवू शकतो?

२०२७ मध्ये चिमूर जिल्हा होवू शकतो?

287

 

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, 9423608179

चिमूर- भारत देशात येत्या काळात जनगणनेला सुरूवात होणार आहे. ही जनगणना २०२७ मध्ये पूर्ण होवू शकते. जनगणनेनुसार देशातील लोकसंख्या, प्रवर्ग, जाती व इतर सर्व माहिती मिळू शकते.

सध्या महाराष्ट्र राज्यात ३६ जिल्हे आहेत. महाराष्ट्र शासनाकडे सध्या २२ जिल्ह्यांची मागणी आहे. काही जिल्हे विस्ताराने व लोकसंख्येने फारच मोठे आहेत अशा जिल्ह्यांचे त्रिभाजन करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात अहिल्यानगर (अहमदनगर) हा जिल्हा विस्ताराने खूप मोठा असल्यामुळे या जिल्ह्याच्या त्रिभाजनाची म्हणजे तीन जिल्हे करण्याची मागणी आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर जिल्हा घोषित करावा ही मागणी फार पूर्वीपासून होत आहे. यानुषंगाने पञव्यवहार, आंदोलन फार मोठ्या प्रमाणात होत आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्याचे महसुलमंञी चंद्रशेखर बावनकुळे चंद्रपूर येथे आले असता त्यांनी शासनाकडे जिल्हा व तालुक्याचे प्रस्ताव असल्याचे कबूल केले. परंतू तूर्त नवीन जिल्हे व तालुके घोषित होणार नाही अशी एकुण स्थिती दिसते आहे.

परंतू दोन वर्षानंतर २०२७ ला सार्वञिक जनगणना झाल्यानंतर नवीन जिल्ह्यांची गरज निर्माण होवू शकते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या व सन १९४२ ला स्वातंञ्याच्या लढ्यात अग्रगण्य असलेल्या चिमूरला जिल्हा घोषित करावा अशी या भागातील जनतेची इच्छा आहे. परंतू यासाठी वाट पहावी लागणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here