Home महाराष्ट्र साहित्यिकांनी प्रश्न समजावून घेऊन त्यावर भाष्य केले पाहिजे: ज्ञानदेव पांडुळे पाथर्डी...

साहित्यिकांनी प्रश्न समजावून घेऊन त्यावर भाष्य केले पाहिजे: ज्ञानदेव पांडुळे पाथर्डी तालुका शाखा नवीन कार्यकारणी निवड

334

 

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : *बदलत्या सामाजिक व्यवस्थेला सामोरे जाताना साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची असून गोरगरीब कष्टकरी श्रमिकांचे प्रश्न समजावून घेऊन लेखक कवीने त्यावर भाष्य केले पाहिजे, त्यासाठी शब्दगंधचे हे महत्वाचे विचारपीठ उपलब्ध झाले आहे.* असे मत रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व शब्दगंध चे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांनी व्यक्त केले.
पाथर्डी येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पाथर्डी तालुका शाखेच्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे पदग्रहण प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे हे होते. यावेळी विचारपीठावर शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, प्राचार्य सुरेश मिसाळ, बंडूशेठ दानापुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ.ढाकणे म्हणाले की,
शब्दगंध म्हणजे सामान्य माणसाने सामान्य माणसांसाठी निर्माण केलेली साहित्यिक चळवळ असून नवलेखकांना आणि वंचिताना संधी देण्याचे काम शब्दगंध करत आहे, त्यामुळेच ग्रामीण भागातील लेखक कवी मोठ्या संख्येने शब्दगंध मध्ये सहभागी होत आहेत. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळांनी एकजुटीने विविध साहित्यिक उपक्रम राबवणे आवश्यक असून नवीन लिहित्या हाताना बळ देणे गरजेचे आहे.
सुनील गोसावी,राजेंद्र उदागे यांनी नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाला शुभेच्छा दिल्या.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य संघटक प्रा. डॉ.अशोक कानडे यांनी केले. सूत्रसंचालन महादेव कौसे यांनी केले तर शेवटी प्रा.डॉ.आशा पालवे यांनी आभार मानले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य सुरेश मिसाळ यांनी संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने सर्व पाहुण्यांचा सत्कार केला.
नवीन निवडलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे..
अध्यक्ष : श्री.अशोक दौंड
कार्याध्यक्ष :प्रा.डॉ.अशोक डोळस
उपाध्यक्ष : प्रा.डॉ.संतराम साबळे
: प्रा.डॉ.आशा पालवे
सचिव : श्री.महादेव कौसे
सहसचिव : प्रा.डॉ.भगवान सांगळे
खजिनदार : श्री.शशिकांत गायकवाड
कार्यकारणी सदस्य म्हणून श्री. संदिप भागवत, श्री.सचिन चव्हाण, प्रा.डॉ.अजय पालवे, श्री.भाऊसाहेब गोरे, प्रा.डॉ.जयश्री खेडकर, श्री.दिलीप सरसे.
प्रसिद्धी प्रमुख : श्री.संदिप शेवाळे
सल्लागार : डॉ.कैलास दौंड,
हुमायून आतार, श्री.राजेंद्र उदारे,
डॉ.अनिल पानखडे, श्री.सुरेश मिसाळ यांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमास पाथर्डी तालुक्यातील अनेक साहित्यिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here