Home महाराष्ट्र डोंगरी जनपरिषदेच्या वतीने आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण ‌.

डोंगरी जनपरिषदेच्या वतीने आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण ‌.

145

गंगाखेड तालुक्यातील डोंगरी भाग शासन दरबारी डोंगरी भाग म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी डोंगरी भागातील जनता डोंगरी जन परिषदेच्या वतीने आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 वार बुधवारपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषणास बसली आहे महाराष्ट्र सुदूर संवेदन उपायोजना केंद्र नागपूर यांनी गंगाखेड तालुक्यातील डोंगरी भागाचे चुकीचे सर्वेक्षण करून डोंगरी भागात एकही गाव येत नसल्याचा अहवाल शासनास सादर केला आहे सुदूर संवेदन केंद्र नागपूर यांनी केलेल्या चुकीच्या अहवालाची तपासणी करून डोंगरी भागाचे पुनर सर्वेक्षण राष्ट्रीय सुदूर संवेदन उपयोजन केंद्र हैदराबाद यांच्यामार्फत करून सर्वेक्षणाअंती डोंगरी भागातील समाविष्ट गावे डोंगरी भाग म्हणून जाहीर करण्यात यावेत या मागणीसाठी डोंगरी जन परिषदेच्या वतीने आझाद मैदानावर उपोषण करण्यात येत आहे जोपर्यंत राष्ट्रीय सुदूर संवेदन उपयोजन केंद्र हैदराबाद यांच्यामार्फत सर्वेक्षणाचा आदेश काढला जात नाही तोपर्यंत डोंगरी भागातील जनतेचे बेमुदत आमरण उपोषण सुरूच राहणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here