Home चंद्रपूर कळमना जि. प. शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंग : आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई...

कळमना जि. प. शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंग : आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांची उपक्रमशील संकल्पना

184

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा :- स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक आणि आधुनिक स्मार्टग्राम म्हणून लौकिक असलेल्या कळमना गावात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्याच परंपरेला पुढे नेत आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी पाणीटंचाईसारख्या ज्वलंत प्रश्नावर उपाययोजना म्हणून जिल्हा परिषद शाळा, कळमना येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम राबविला आहे.
या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्याचे संवर्धन, साठवणूक आणि नियोजन याचे प्रत्यक्ष धडे मिळत आहेत. आता हेच विद्यार्थी आपल्या पालकांना घरी देखील रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी प्रेरित करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यापेक्षा ते जमिनीत मुरविले, तर भूजलपातळी वाढेल आणि भविष्यातील पाणीटंचाई टळेल, हा संदेश या प्रयोगातून समाजापर्यंत पोहोचत आहे.
या कार्यक्रमाला सरपंच नंदकिशोर वाढई यांच्यासह पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, चिंचोली–कळमना पटवारी चेननुरवार, ग्रामसेवक शुभांगी कवलकर, मुख्याध्यापिका बेबीनंदा दुधे, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते सुरेश गौरकार, सुरेश मुठलकर, सहाय्यक शिक्षक दिलीप निमकर, शालीक पेदोर, शिक्षिका वनिता गोखरे तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here