Home चंद्रपूर एका जनप्रतिनिधीचा गणेश उत्सव गाजला तर दुसरा जनप्रतिनिधी दुर्गा उत्सव गाजवेल काय?...

एका जनप्रतिनिधीचा गणेश उत्सव गाजला तर दुसरा जनप्रतिनिधी दुर्गा उत्सव गाजवेल काय? नागरिकांच्या चर्चा कितपत खऱ्या ठरतील

286

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 8888628986

ब्रम्हपुरी:- उत्सव हा भारतीय परंपरेचा एक आनंदाचा भाग आहे. परंतु उत्सव सुद्धा आता राजकारणाला बळी पडत आहे. स्वतःचा अस्तित्व टिकविण्यासाठी किंवा जनतेसोबत जोडून राहण्यासाठी आजकाल जनप्रतिनिधी उत्सवास प्राधान्य देत आहेत. एका जनप्रतिनिधीचा गणेश उत्सव गाजला तर दुसरा जनप्रतिनिधी दुर्गा उत्सव गाजवेल काय? असा प्रश्न ब्रम्हपुरीतील नागरिकांना पडत आहे. ह्या सर्व नागरिकांतील चर्चा कितपत खऱ्या ठरतील हे येणाऱ्या दिवसात कळेलच.
ब्रम्हपुरी हा शिक्षणासोबत, शांत आणि वेगळ्या रूपात बागायच झालं तर अवैद्यरित्या कामासाठी प्रसिद्धी झोतात आहे. मटका, जुगार व मोठ्या प्रमाणात अवैध रेती तष्करीसाठी प्रसिध्द आहे. सोबत आता उत्सवासाठी प्रसिद्धीस आला आहे. येथील राजकारण वेगळ्याच वळणावर असल्याचे चित्र समोर येत आहे. एका जनप्रतिनिधीची प्रतिमा समजणारे आणि उजवा की डावा हात समजणारे हात मिळविण्याकरिता दुसऱ्या जन प्रतिनिधीकडे गेल्याच्या जोरदार चर्चा ब्रम्हपुरी वासियांमध्ये सुरु होत्या. एकीकडे जातीवादी राजकारणाचे वादळ पसरले होते. अशा परिस्थितीत एका जनप्रतिनिधीचे तुटके बुटके कार्यकर्ते दूर झाल्याचे चित्र समोर आल्याचे दिसले. अशात संधी बघता दुसरा जनप्रतिनिधी आपले पाऊल मजबूत करण्यासाठी दुर्गा उत्सवाची तैयारी करीत असल्याची गुपचूप चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here